६) आमुचा बाप तुझा पोसणा । कां हो नारायणा विसरसी ॥१॥
धाकुटपणा मज म्हणियेंलें । आतां कां हो कठिण केलें ॥२॥
ब्रीद सांभाळी विठ्ठला । तरिच भलेपण तुला ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा । देवा न विसरावें मला ॥४॥
७) आमुची केली हीन याती । तुज कां न कळे श्रीपती ॥१॥
जन्म गेला उष्टे खातां । लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥
आमचे घरीं भात दहीं । खावोनी कैसा म्हणसी नाहीं ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा । कासया जन्म दिला मला ॥४॥
८) आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी । म्हणोनी जेविलासे त्याचे घरीं ॥१॥
तेव्हां तुज काय उपवास होते । म्हणोनी सांगातें जेविलेती ॥२॥
तईचा तूंचि देवा झालासि पारिखा । आम्हां कां सारिखा न धरसी ॥३॥
कर्ममेळा म्हणे तुज आमुची आण । आमुची निजखूण दावीं देवा ॥४॥
९) आमुच्या बापाचें ठेवणें । कां तूं न देसी आम्हां कारणें ॥१॥
कैसी तुझी नीत बरी । मागतां शिणलों मी हरी ॥२॥
वाउग्या येरझारा । किती कराव्या दातारा ॥३॥
कर्ममेळा म्हणे हरी । किती मागावें निर्धांरी ॥४॥
१०) आहेसी ठाउक मागां संतजनां । रिणाईत जाणा बहुतांचा ॥१॥
घेणें ज्याचें त्यास देणें नाहीं हरि । ऐसी हे परि जाणतसी ॥२॥
साजतसे तुम्हां थोर थोरपण । आमुचें कारण आम्हीं जाणों ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा । आपुला तो ठासा सांभाळावा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.