११) चहूंकडे देवा दाटला वणवा । कां न ये कनवा तुजलागीं ॥१॥
सांपडलें संधी संसाराचे अंगी । सोडवी लगबगी मायबापा ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ । लाविलासे चाळा येणें मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना । येऊं द्या करूणा देवराया ॥४॥
१२) चोखा म्हणे निर्मळेसी । नाम गाये अहर्निशी ॥१॥
तेणें संसार सुखाचा । इह परलोक साचा ॥२॥
साधन हेंचि थोर असे । शांति क्षमा दया वसे ॥३॥
ऐकातांचि आनंदली । निर्मळा मिठी चरणीं घाली ॥४॥
१३) जीवीचें सांकडें वारी देवराया । अहो पंढरीराया धांवा वेगीं ॥१॥
कां बा मोकलितां शरण आलिया । कां बा न ये दया तुम्हांलागीं ॥२॥
अनाथ परदेशी तुम्हांविण कोण । सुखें समाधान करा माझें ॥३॥
तुमचिया पोटीं बहु वाव आहे । अधीर हा होय जीव माझा ॥४॥
निर्मळा म्हणे बोलण्याची मात । माझा तो वृत्तांत निवेदिला ॥५॥
१४) तिहीं त्रिभुवनीं विस्तारिली कीर्ती । तो हा श्रीपती उभा विटे ॥१॥
अनाथाचा नाथ पतित पावन । हें आम्हां वचन सांपडलें ॥२॥
नाम धारकाच्या लागेन चरणीं । घेईन पायवणी पोटभरी ॥३॥
आनंदे निर्भर नाचेन महाद्वारीं । संत अधिकारी तेथीचे जे ॥४॥
निर्मळा करी प्रेमाची आर्ती । करोनी श्रीपति वोवाळित ॥५॥
१५) तुमचा भरंवसा धरोनी मानसीं । दृढ पायांसी शरण आलें ॥१॥
आतां कळेल तो करावा विचार । मी आपुला भार उतरिला ॥२॥
मांडीवरी मान ठेविली संपूर्ण । पुढील कारण जाणोनियां ॥३॥
निर्मळा म्हणे तारा अथवा मारा । तुमचें तुम्ही सारा वोझें आतां ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.