शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न तें मुखा रुचि नेदी ॥१॥
आतां दोहीं पक्षीं लाविलें लांच्छन । देव भक्तपण लाजविलें ॥२॥
महत्वाची पायीं पडली शृंखळा । बांधविला गळा स्नेहा हातीं ॥३॥
तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा । वाढविली निद्रा आळस बहु ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.