आली तरी आस । झालों ऐकोनि उदास ॥१॥

आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरि ॥२॥

भलते ठायीं पडो । देह तुझे पायीं जडो ॥३॥

तुमचें तुम्हांपाशीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥४॥

गेला मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥५॥

तुका म्हणे चित्त । खंती नाहीं वागवीत ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel