सर्व माझें कुळ करिन विष्णुदास । अवघें वैकुंठास पाठवीन ॥१॥

यमाचे हातींचे सोडवीन दंड । भरीन ब्रम्हांड हरिनामें ॥२॥

नामें तीन्ही लोकीं होईन सरता । नाहीं भयचिंता संसाराची ॥३॥

अवघ्या विश्वमुखें होईन देवाचा । दास विठ्ठलाचा तुका म्हणे ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel