जेथें तेथें तूं सर्वां घटीं व्यापक । नाहीं ठाव एक रिता कोठें ॥१॥
ऐसा असोनियां माझिया संचिता । डोळां कां अनंता न पडसी ॥२॥
आग लागो माझ्या ऐसिया अदृष्टा । धिक मी करंटा जन्मा आलों ॥३॥
तुका म्हणे काय करावें न कळे । हृदय माझें जळे भेटीसाठीं ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.