आतां नाहीं आतां एकचि मोहरा । पासोनी अंधारा दुरी झालों ॥१॥
साक्षित्वें त्या झालों गुणाचा देखणा । करी नारायणा तरी खरें ॥२॥
आठव विसरु पडियेला मागें । आले तेचि भागें यत्न केले ॥३॥
तुका म्हणे माझा विनोद देवासी । आम्ही तुम्हा ऐसीं दोन्ही नव्हों ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.