रुप दावीं कां रे आतां । सहस्त्र भुजांच्या मंडिता ॥१॥
शंक चक्र पद्म गदा । गरुडासहित ये गोविंदा ॥२॥
सकळांचें समाधान । नाहीं देखिल्यावांचून ॥३॥
तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयना ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.