तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥

आझुनी कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहतोसी ॥२॥

आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभुके ॥३॥

प्रेमरस पान्हा पाजीं माझे आईं । धांवें वो विठाई वोरसोनी ॥४॥

तुका म्हणे माझें कोण हरी दुःख । तुजवीण एक पांडुरंगा ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel