ठिरीचें मांदळ नासिकाचें चंग । नाचती सुरंग नाना छंदें ॥१॥
दगडाचे टाळ दुसर्या चिपुळ्या । वाजविती टाळ्या दोहों हातीं ॥२॥
मुखीं गाती गाणें हरि राम कृष्ण । प्रेमें नारायण तया अंगीं ॥३॥
नाहीं भय धाक कळिकाळ त्यांसी । आपआपणासी विसरले ॥४॥
तुका म्हणे भावा भुललासे देव । अधिकचि हांव चढे दुणी ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.