दगडाचा टाळ घेउनियां हातीं । वाखाणितों कीर्ति निजनामें ॥१॥
काय आम्ही येथें करावीं साधनें । तालस्वर गाणें तेंहि नाहीं ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवींच्या जिवलगा । सुखें पांडुरंगा आठवितों ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.