तुझें रुप वेळोवेळां । भरो माझ्या दोहीं डोळां ॥१॥
राम नाम वदो वाणी । हरिकथा पडो कानीं ॥२॥
पायीं तीर्थयात्रा घडो । देह संताघरीं पडो ॥३॥
हातीं घडो देवपूजा । सर्वकाळ गरुडध्वजा ॥४॥
तुका म्हणे देवा । घडो वैष्णवांची सेवा ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.