काय ते विरक्ति न कळेचि आम्हां । जाणो एका नामा विठोबाच्या ॥१॥
नाचेन मी सुखें वैष्णवांचे मेळीं । दिंडी टाळघोळीं आनंदीं या ॥२॥
कासया उदास होऊं देहावरी । अमृत सागरीं बुडोनियां ॥३॥
कासया एकांत सेवूं तया वना । आनंद या जनामाजी असे ॥४॥
तुका म्हणे मज आहे हा भरंवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.