हरिजनीं प्राण विकली हे काया । अंकिला मी तयां घरी झालों ॥१॥
म्हणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥२॥
आस करुनियां राहेन अंगणीं । उच्छिष्टाची धणी घ्यावयासी ॥३॥
चालतां ते मार्गीं चरणींचे रज । उडती सहज घेईन ते ॥४॥
दुरी त्यापासूनी नवजें दवडितां । तुका म्हणे लाता घेइन अंगीं ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.