आणिक उपाय नेणेचि मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे ऐसें ॥१॥

नये धड कांहीं बोलता वचन । रिघालों शरण सर्व भावें ॥२॥

कृपा करिसी तरी थोडें तुज काम । माझा तरी श्रम बहु हरे ॥३॥

तुका म्हणे मज दाखवीं श्रीमुख । हरे तान भूक डोळियांची ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel