उल्लंघिला सिंधु केली पायवाट । संसार हा नष्ट पाठिमोरा ॥१॥

करुनियां सुख हरिनामप्रसंगीं । टाळ दिंडी रंगी नाचतसों ॥२॥

लाविले दमामे मृदंग या भेरी । गर्जे महाद्वारी रामनाम ॥३॥

तुका म्हणे झाले सर्व नेम केले । सार्थक घडले जन्माचें या ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel