दोघां पडियेली समंधेंसी गांठी । न पडेचि तुटी एकपणीं ॥१॥
झाल्या ऐक्यभाव नाहीं दुजा भेद । अखंड आनंद घनदाट ॥२॥
बोलावया तेथें नाहीं वाचा उरी । कोंदला श्रीहरि सदोदित ॥३॥
तुका म्हणे तया सुखा नाहीं पार । अखंड निर्भर विचारितां ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.