आदि हे पंढरी सुखाची वोवरी । अवघा घरोघरीं ब्रम्हानंदु ॥१॥

अवघा विठ्ठल सुखाचाच आहे । अनुसरे तो लाहे सर्व सुख ॥२॥

पहावा नयनीं ऐकावा श्रवणीं । अवघेचि होउनि एकचित्त ॥३॥

विठोबाचें नाम अवघेंचि गोमटें । ऐकावेंचि वाटे पुढत पुढती ॥४॥

अवघेंचि आयुष्य सरोनी जाईल । मग कोण होईल साह्य तुम्हा ॥५॥

अवघा काळ वाचे म्हणा नारायण । वायां एक क्षण जाऊं नेदा ॥६॥

अवघा प्रपंच जाणोनि लटिका । शरण रिघा एका पंढरिराया ॥७॥

तुका म्हणे अवघे सुखाचेचि व्हाल । जरि मन ठेवाल पांडुरंगीं ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel