ऐसा ज्याचा अनुभव । विश्व सत्य तोचि देव ॥१॥
देव तयापाशीं असे । पहावा दर्शनींच दिसे ॥२॥
कामक्रोध नसे चित्ता । भूतीं झाली हो समता ॥३॥
तुका म्हणे भेदाभेद । गेला समूळीं विवाद ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.