नरदेहा यावें हरिदास व्हावें । तेणें चुकवावें जन्ममरण ॥१॥
नाहीं तरी वायां शिणविली माय । नरकासी जाय जन्मोजन्मीं ॥२॥
तीर्थव्रतदान देवाचें पूजन । ऐसें हें साधन साधकाचें ॥३॥
तुका म्हणे मुखीं नित्य म्हणे हरि । तया सुखा सरी नाहीं पार ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.