देऊळासी जातां लाजसी गव्हारा । दासीचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥

संतांसी देखोनी होसी पाठमोरा । दासीचिया पोरा दाम देसी ॥२॥

संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीसी अंघोळ सारी पाणी ॥३॥

संतांसी देखोनी करितो टवाळ्या । दासीचिया चोळया धुतो भावें ॥४॥

तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel