जाणावी ती कृपा हरीची जाहली । चिंतनीं लाविली मनबुद्धि ॥१॥
अनुभव होतां वासना विराली । वृत्ति मुरडली उफराटी ॥२॥
नामरुप संतसेवन आवडे । कीर्तन पवाडे हरिचे गुण ॥३॥
तुका म्हणे पायवणी । त्यांचे पाजा मज कोणी ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.