काय बोलोनियां तोडें । मनामाजी कानकोंडें ॥१॥
परस्त्रीसी म्हणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥२॥
धर्माधार्मिक गोष्टी सांगे । उष्टे हातीं नुठवी काग ॥३॥
जुनें कर्म घडलें अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥४॥
बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.