भोजन सारिलें आर्त न समाये । एकत्वचि होय भिन्न लीला ॥१॥
सगुणाची पूजा विधान सारिलें । घेतला तांबूल पडिभरें ॥२॥
देवभक्त स्तुति करिती अपार । तेणें होय भार शरीरासी ॥३॥
जोडुनियां कर ठेवियला माथा । तुका म्हणे आतां क्षमा करा ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.