तनमन माझें गोविंदाचे पायीं । वेधियेलें बाई न सुटेचि ॥१॥
गोत वित्त चित्त नाठवेसें झालें । मन विसरलें मनपणा ॥२॥
लज्जा भय चिंता द्वेष मोह दुःख । तहानही भूक विसरलें ॥३॥
विसरलें कुळ यातीचा स्वभाव । मिराशीचा गांव एक झाला ॥४॥
लागली समाधि नाठवे दुसरें । झाले एकसरें तद्रूपचि ॥५॥
चिदानंदीं वृत्ति झालीसे निमग्न । लावियलें लग्न स्वरुपेंसी ॥६॥
अखंड समाधि गोविंद नामाची । असें माझें मीचि तदाकार ॥७॥
तदाकार वृत्ति गोविंदाचे पायीं । तुका म्हणें नाहीं दुजें आतां ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.