माडयावरुतें पांजलें शरीर । झाला धुंधुकार दाही दिशा ॥१॥
टाळघोळ वीणा मृदंगाचे घोष । गाती हरिदास नाचताती ॥२॥
नेणों मागें पुढें होती हरिकथा । पाहतां पाहतां भ्रम लोकां ॥३॥
हातावरी हात मारुनि जातो तुका । परि कोणा एका उमजेना ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.