कपिकुळीं हनुमंत । तया माझें दंडवत ॥१॥

स्वामी माझा ब्रह्मचारी । मातेसमान अवघ्या नारी ॥२॥

उपजतां बाळपणीं । ग्रासूं पाहे वासरमणी ॥३॥

अंगीं सेंदुराची उटी । शोभे सुवर्ण कांसुटी ॥४॥

अखया पुत्र तो मारिला । जंबु माळी त्राहाटिला ॥५॥

काम धातला बांदोडी । काळ केला देशोधडी ॥६॥

बम्हगोळ पुच्छें कवळी । ऐसा महारुद्र बळी ॥७॥

जाउनी पाताळा । केली देवीची अवकळा ॥८॥

रामरायाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel