भक्तीचें तें सुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥
उदंड अक्षरें केली भरोवरी । परि तें वर्म दुरी विठोबाचें ॥२॥
बहु जरी शहाणे झाले तर्कवंत । नेणवेचि अंत विठोबाचा ॥३॥
तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सीण रितें माप ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.