येथें आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥१॥
मन येथें साह्य झालें । हरिच्या धालें गुणवादीं ॥२॥
चुकुर तो गेला काळ । झालें फळ संगाचें ॥३॥
तुका म्हणे धरुं सत्ता । होइल आतां करुं तें ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.