झेडुग्याचे आळां अवघीं चिपाडें । येथें काय गोडें निवडावीं ॥१॥

संवसार भ्रमें परमार्थ जोडे । ऐसें घडे जाणते हो ॥२॥

ढेंकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येईल त्या ॥३॥

तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । शिकविला शेवटीं विचारु त्या ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel