जालों नवसांचीं । आम्ही तुम्हास वाणीचीं ॥१॥
कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥२॥
पिंडदान देतें । कोण नाम तुझें घेतें ॥३॥
तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतेती वोसंगा ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.