पहुडले जन विवळली राती । चुकले पुढती कल्होळासी ॥१॥
तुम्हा रंजवितों आपुलिया चाडे । गायें नाचें पुढें आवडीनें ॥२॥
तुम्हालागीं आम्ही जागवूं बळेंचि । केली क्षमा त्याची पाहिजे त्वां ॥३॥
तुका म्हणे तूं बा दयाळू कोंवसा । सेल दिल्ही दासा सद्भक्तीची ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.