मायाबापापुढें बाळकाचा घात । आपणा देखत होऊं नेदी ॥१॥
काय मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक तुझे हातीं ॥२॥
वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान्ह भूक वाहे कडे खांदीं ॥३॥
तुका म्हणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.