जेणें झाला तुझ्या पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥
भरोनियां घरीं राहिलों विख्याती । आपुली निश्चिती आपणापें ॥२॥
आतां काय उरी उरलें तें सांगा । आणिलेती जगाचिये साक्षी ॥३॥
तुका म्हणे कोठें पाहों जासी आतां । माझी झाली सत्ता तुम्हांवरी ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.