आतां नको कोठें जाऊं माझ्या मना । राहें समाधाना आपुलिया ॥१॥
सोडीं दुष्टबुद्धि राहें मना स्थिर । हाचि भाव थोर तुझ्या हातीं ॥२॥
आतां कासावीस कां रे होसी मना । भवाब्धि तरवेना मज पाप्या ॥३॥
तुका म्हणे मना करीं माझें हित । राहें अखंडित हरिपायीं ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.