नाम घेतां उठाउठी । होय संसाराची तुटी ॥१॥
ऐसा लाभ घाला गांठी । विठ्ठलपायीं घाला मिठी ॥२॥
नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशिल आणिक कांहीं ॥३॥
हाकारोनी सांगे तुका । नाम घेतां राहूं नका ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.