वाउगें घरदार वाउगा संसार । वाउगें शरीर नाशिवंत ॥१॥
एक नाम सार वाउगा पसार । नमाचि निर्धार तरती जन ॥२॥
वाउग्या या गोष्टी वाउग्या कल्पना । वाउग्या ब्रह्मज्ञाना कोण पुसे ॥३॥
वाउग्या व्युत्पत्ती वाउग्या शब्दआटी । वाउग्या ज्ञानगोष्टी बोलून काई ॥४॥
वाउगें तें मन स्थिर नाहीं तरी । मग कैंचा हरी मिळे तया ॥५॥
वाउगे ते बोल बोलणे तोंवरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.