येई वो विठठले येई लवकरी । धावे तूं सत्वरी मजलागी ॥१॥
आमुचा विचार आतां काय देवा । सांभाळी केशवा मायबाप ॥२॥
आतां कवणाची पाहूं मी वांट । अवघेची वोस दिसतसे ॥३॥
सोयरा म्हणे अहों पंढरीच्या राया । आमुची ती दया येऊं द्यावी ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.