नामेचि तरले नर आणि नारी । ताले दुराचारी हरिनामें ॥१॥
पाहा अनुभव आपुले अंतरी । नामेंचि उध्दरी जडजीवां ॥२॥
नामेंचि भुक्ति नामेची मुक्ति । नामेंची शांति सुखदु:ख ॥३॥
नामापरतें सार याही हो निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.