नामाचें चिंतन करा सर्वकाळ । नाही काळवेळ नामालागी ॥१॥
सुलभ हें सोपें नाम आठवितां । हरि हरि म्हणतां मोक्षमुक्ती ॥२॥
सायासाचें नाही येथे हें साधन । नामाचे चिंतन करा सुखे ॥३॥
नामाचे सामर्थ्य जपतां श्रीहरी म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.