विठोजीज्ञानदेवा ॥ तुझीविश्रांतिमनठेवा ॥ तेमुरालीआमुचियाभावा ॥ निःसंदेहें ॥१॥

कैसेंसमाधानज्ञानदेवा ॥ अळंकापुरींसमाधिठेवा ॥ विठ्ठल ओळलावोल्हावा ॥ नित्यरूपसमाधी ॥२॥

संतकरितीमहाखेद ॥ म्हणतीज्ञानांजन ॥ मगचालिले विद्वद ॥ अळंकापुरी ॥३॥

महावल्लीवृक्षअज्ञान ॥ तोनिपेक्षिलापूर्णघन ॥ मगविठोजीम्हणेआपण ॥ ज्ञानदेवासी ॥४॥

धन्यधन्यज्ञानेश्वरा ॥ ॥ पुण्यप्रभूमिसभाधिस्थिरा ॥ कृष्णपक्षींतुजनिर्धारा ॥ भेटीदेतजाईन ॥५॥

कार्तिकमासशुद्धएकादशी ॥ पंढरीयात्राहोईलसरसी ॥ दुसरीकृष्णपक्षींतुजनिर्धारेंसी ॥ दिधलीअसे ॥६॥

हेऐकोनिसंतजनीं ॥ जयजयकारकेलाध्वनी ॥ दिंडीपताकामेळगगनीं ॥ देवसुमनेंवर्षताती ॥७॥

नामाम्हणेआलेवैष्णव ॥ अळंकापुरींमिळालेदेव ॥ समाधिसुखेंज्ञानदेव ॥ बैसतेझाले ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel