महातुसावत्रयोदशी ॥ केलात्याज्ञानदेवासी ॥ मगनामाम्हणेविठोबासी ॥ चरणधरूनियां ॥१॥
समाधिसुखदिधलेदेवा ॥ ज्ञानांजनसमाधिठेवा ॥ अजानवृक्षींबीजवोल्हावा ॥ याज्ञानजनांसी ॥२॥
कृपाआलीविठ्ठलासी ॥ म्हणेज्ञानदेवापरियेसी ॥ तीर्थभागीरथीआहेनिसी ॥ तुजनित्यस्नानासीदिधली ॥३॥
इंद्रायणीदक्षिणवाहिनी ॥ भागीरथीमनकर्णिकादोन्ही ॥ इयामिळालियात्रिसंगमीं ॥ पुण्यभूमीतूझिये ॥४॥
येथेंजरीनित्यस्नानघडे ॥ तरीनित्यवैकुंठवासघडे ॥ तुजनाहींनाहींकुवाडे ॥ मीकोडेंउभाअसें ॥५॥
जेथेंहरिकथानामाचें ॥ जोउच्चारीलविठ्ठलाचें ॥ तयासीपेणेंवैकुंठींचे ॥ दिधलेंसाचेसीअक्षरे ॥६॥
आणिकऐकेरेज्ञान राजा ॥ जोयासिद्धेश्वरींकरीलपूजा ॥ तोअंतरंगपैंमाझा ॥ मुक्तिसहजाजहालीतयासी ॥७॥
नामाम्हणेऐकअंतरंग ॥ कैसाओळलापांडुरंग ॥ ज्ञानदेवसमाधिसांग ॥ हरीपाठकीर्तनें ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.