तवनावेकश्रीहरी ॥ तटस्थघटिकाचारी ॥ ध्यान धरूनीअंतरी ॥ निश्चळराहिला ॥१॥
जयजयशब्दनामाबोभाये ॥ केशवात्राहेत्राहे ॥ मीव्याकुळहोत आहे ॥ ज्ञानदेवाकारणे ॥२॥
नारायणत्राहेत्राहे ॥ कृपादृष्टीतूरेपाहे ॥ मीव्याकुळहोतआहे ॥ ज्ञान देवाकारणे ॥३॥
तुझेनीदर्शने ॥ ज्ञानाचेनी अवलोकने ॥ मजपंढरीसअसणे ॥ तुझेचरणीगा विठ्ठला ॥४॥
आतामजतूसांभाळी ॥ ज्ञानदेवा वीणसदाकाळी ॥ मजनकंठेनिशिमंडळी ॥ भानुसहितवर्तता ॥५॥
तूमाझीजनकजननी ॥ परी ज्ञानदेवावीणमनी ॥ शून्यवाटेमेदिनी ॥ जैसे मच्छजीवनेविण ॥६॥
तूरक्षितासर्वजीवांसी ॥ तरीकादुःखदिधले आम्हासी ॥ तूजवळीअसता ह्रषीकेशी ॥ ऐशीदशाहेप्राप्त ॥७॥
नामाखेदे क्षीणझालाजीवे ॥ तवनेत्रउघडिलेदेवे ॥ आलिंगेलाकेशवे ॥ चारीभुजापसरूनी ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.