भक्तपुंडरीकपुढारला ॥ करजोडोनीबोलिला ॥ वेदादिकातुझाअबोला ॥ अनंतलीलास्वरूपाची ॥१॥
ऐसातूसमर्थश्रीरंगा ॥ प्रगट आमुचियाभागा ॥ भीमातटीपांडुरंगा ॥ भक्तजनातारावया ॥२॥
नवर्णवेभक्तपण ॥ नकळेतुमचेमहिमान ॥ नबोलवेतवसाधन ॥ जन्मीकोणकेलेहोते ॥३॥
निरेभिवरेचेसंगमी ॥ चंद्रभागेउगमी ॥ वेणुनादीनारदस्वामी ॥ प्रेमनामीडोलतसे ॥४॥
तरीतूस्वामीदयाळ ॥ महाविष्णुतूगोपाळ ॥ भक्तालागीतूकृपाळ ॥ दीनवत्सलापांडुरंगा ॥५॥
प्रेमातुवाकरोनिमाझेमिस ॥ राहिलासयुगीअठ्ठावि ॥ धरूनसगुणरूपास ॥ ऐसाभक्तिभुललास ॥६॥
तूनियंताईश्वरमूर्ति ॥ सकळगोसावीश्रीपती ॥ तुजवाचूनीनेणेमती ॥ दयामुक्तिसागरा ॥७॥
नामाम्हणेपुंडलिका ॥ स्तुतीआदरकेलानिका ॥ देवम्हणतीपुण्यश्लोका ॥ धैर्यविवेकतूहोसी ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.