अर्हंत (जीवनमुक्ति) , सम्यक (संपुर्ण) , सम्बुद्ध (जागृत) , विद्या व आचरण यांनी युक्त , सुगति ज्याने प्राप्त केलेली आहे . असा लोकांना जाणणारा , सर्वश्रेष्ठ , दमनशील पुरुषांचा सारथि व आधार देणारे , देव मनुष्य व यांचा गुरु असा हा भगवान बुद्ध आहे.
अशा या बुद्ध भगवन्ताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करित आहे ।।१।।
मागे जे बुद्ध होऊन गेलेत पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध आहेत त्या सर्वांनाच मी सदैव वन्दन करतो ।।२।।
मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाही , केवळ बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे . ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो ।।३।।
बुद्धाच्या पवित्र चरणधुळीला मस्तक वाकवून मी वन्दन करतो . बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर तो बुद्ध भगवान मला क्षमा करो ।।४।।
ह्या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही . त्या (बुद्ध) रत्नाने माझे कल्याण होवो . (ज्ञान प्राप्त झालेल्या) ज्याने पुज्य बोधिवृक्षाखाली बसून मार (कामदेव) ह्याच्या अफाट सेनेसह पराभव केला . अनन्त ज्ञान प्राप्त करुन ज्याने बुद्धत्व प्राप्त करुन घेतले . जो सर्व जगात श्रेष्ठ आहे . अशा बुद्धाला मी नमस्कार करतो ।।५।।