वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या डोक्यावरील व दाढीवरील केसातून व डोळ्याच्या नीलस्थानातुन प्रभावित होणारा निळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।१।।
वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणार पिवळा रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।२।।
वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या मांसातील व डोळ्यातील रक्त वर्ण स्थानांतील आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।३।।
वज्रासारखा अभेद देह धारण कराणाऱ्या भगवान बुद्धाच्या दातांतून , अस्थितून , डोळ्यातील पांढऱ्या स्थळांतून प्रभावित होणारा शुभ्र रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापुन राहीला आहे ।।४।।
वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयवात मन प्रभावीत होणारा केसरी रंग , समुद्र , धरती व आकाशात व्यापून राहीला आहे ।।५।।
वज्रासारखा अभेद्य देह आणि वरील रंगानी परिपूर्ण असलेल्या अनंतामध्ये फडकणाऱ्या व सदैव मनोहर दिसणाऱ्या भगवान बुद्धाच्या धम्मध्वजाला आम्ही काया , वाचा व मनाने वंदन करतो ।।६।।