आद्यस्थान तुझे करविरपुर मारे ।
प्रसन्न वदने वससी माये मन रमतें ॥
सुरवर किन्नर पूजिती ध्याती स्थिर चित्तें ।
महिमा न कळे तुझा गाती भावार्थे ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
आरती करितां तूं हरिसी अवलक्ष्मी ॥ धृ. ॥
दक्षिणभागीं तुझ्या कालीचेस्थान ।
सरस्वतीचें सव्यभागीं ते ठाण ॥
तुझ्या सन्मुख माते शोभे गजवदन ।
काशीतुल्य महिमा गाती मुनिजन ॥ जय. ॥ २ ॥
महिषासुरनिर्दळण प्रथम केलेसी ।
शुंभरक्तबीज तेही वधिलेसी ॥
सर्वहि असुरी मर्दुनि स्वस्थ जाहलिसी ।
सुराधिकारी इंद्रा त्वा स्थापियसी ॥ जय. ॥
भजन करितां तुझे मुक्ति पै देसी ।
इहलोकीं सुखभोग भक्तां ओपीसी ॥
जनार्दन वदला परम भावेंसी ।
वरदहस्त माथां ठेवीं भक्तासी ॥
जय देवी जय देवी. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel