मी तूं विरहित हें तूं तें तूं तुकाई ।
मींपण सरतां सरलों तू पण तें कोई ॥
भी तूं विसरे तिसरे साक्षीपण सोयी ।
ते सुख अनुभवसिद्धां प्रगटें तव पायीं ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय करुणा सरिते ।
रघुवरवरदायके वारिं सि भवदुरितें ॥
मानस तुळजापुरी नांदसि गुणभरिते ।
सरिते करिं अज्ञान दे ज्ञान पुरतें ॥ धृ. ॥
महेशिं अखिले निखिले निगमागमसारे ।
विबुधा सुबुद्धां साधन सुविचारे ॥
अटतां पठतां कथितां मथितां तनु सारे ।
हेमांगी तव महिमा न कळे निरधारें ॥ जय. ॥ २ ॥
सुर मुनी कनंकाभरणें सांडुनिया परती ।
रंके वैराटंके धरिसी त्यावरती ॥
अनाथनाथ अंबे न कळे हे युक्ती ।
जाणे तो जोगवा मागे गुरुभक्ती ॥ जय. ॥ ३ ॥
स्तवनाचे चोडकें श्रद्धागुणवंती ।
गाती गोंधळ दिवट्या साधन बघ पंथी ॥
उदी आनंदी चालुनि लागी पदि भक्ति ।
मुक्तेश्वरासि त्रिपुरे दे भुक्ति मुक्ति ॥ जय. ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel