अर्णवसमिप दक्षिणे भार्गवकृत धरणी ।
असे देविग्रामी स्थिति अद्‌भुत करणी ॥
मार्गेश्वर बहुळी यात्रा तव जननी ।
जन पूजिति सद्‌भावे कुलदैवत म्हणुनी ॥ १ ॥
जय देवी जय देवी सुरवरमुनिपुजिते ।
जय श्रीआर्यादुर्गे संकटभयहरिते ॥ धृ. ॥
स्थित्युद्‌भवलयकारिणी विधिहरिहरजतिते ।
करुणालयसुरपालिनि भवभयसंहरिते ॥
त्रिभुवनमंडणखंडणकर दुस्तरसं हरिते ।
उपमा न दिसे कोठे अद्वयगुणभरिते ॥ २ ॥
विषयविरक्त मानुनि रतलो सुखसदना ।
त्याजिलें खळमति भरुनी तव नामस्मरणा ॥
कवि किंकर गोपाल माते तव चरणा ।
शरण येउनि मग अभकर वचना ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel