श्वासोच्छ्‌वास अवघा तुझिये स्वाधीन ।
ज्ञानेंद्रियीं तेव्हां तुजलाची ज्ञान ॥
कर्मेंद्रीयीं अवघें तव कर्माचरण ।
अंतर्मने ॥ करिसी तूंची जगरचन ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय माहेश्वरी ।
आरती ओवाळूं तुज योगेश्वरी ॥ धृ. ॥
तुझिया ज्ञाना अंगे मी तो सज्ञान ।
तुझिया अज्ञानांगे मी अज्ञान ॥
कर्मोपासक ज्ञान तव नाटक पूर्ण ।
व्यर्थचि मीपण माझा देहाभिमान । जय देवी. ॥ २ ॥
अनंत ब्रह्मांडे ती तूंची होसी ।
अंत:करणद्वारें तूंची हो स्फुरसी ॥
जन्ममृत्यूसंसृति तूंची हो वहासि ।
बाला व्यर्थचि मी पण माझी आसोशी ॥ जय. ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel